शादी डॉट कॉमवर ओळख, महिलेसोबत शारीरिक संबंध आणि 11 लाखांची फसवणूक
Kolhapur Crime News: संशयित आरोपीने संबंधित पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत पैसे मागण्यास सुरुवात केली. यातून तब्बल 10 लाख 94 हजार रुपयांची रक्कम हडपली.
कोल्हापूर: शादी डॉट कॉम या वेबसाईटवर तरुणींशी ओळख करून त्यांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत असतात. सध्या एका महिलेची तब्बल 11 लाखांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आल आहे. या घटनेची नोंद कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे. फिरोज निजाम शेख असं या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील एका घटस्फोटीत पीडित महिलेची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. शादी डॉट कॉम या वेबसाईटवरील अकाउंटवरून पुण्यातील एका व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधला. तिच्याशी ओळख करून हळूहळू प्रेम संबंध निर्माण केले. या ओळखीनंतर संशयित आरोपीने संबंधित पीडित महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत पैसे मागण्यास सुरुवात केली. यातून तब्बल 10 लाख 94 हजार रुपयांची रक्कम संशयिताने घेतली. पीडित महिलेला फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर जुना राजवाडा पोलिसात याबाबत तक्रार दिली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून आरोपीचाही शोध घेत आहे.
Web Title: Identity, physical relationship with woman and fraud of 11 lakhs
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News