युवकाचा खून, घरासमोर फेकून दिला मृतदेह
Nashik Crime: अज्ञात इसमाने खून करून शेतातील घरासमोर रात्रीच्या वेळेस मृतदेह टाकून देत पळून गेला.
दिंडोरी: काही दिवसांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे जुन्या वादातून दोघांनी दिवसाढवळ्या एकाची हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा तालुक्यातील गणेशगाव येथील युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव येथील शेतकरी असलेला युवक ज्ञानेश्वर उत्तम पिंगळ (वय ४०) याचा अज्ञात इसमाने खून करून शेतातील घरासमोर रात्रीच्या वेळेस मृतदेह टाकून देत पळून गेला आहे. गेल्या आठ दिवसांत दुसऱ्यांदा तालुक्यात खुनाची घटना घडल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पंचनामा करून अधिक तपास दिंडोरी पोलिसांकडून केला जात आहे.
Web Title: youth was killed, the body was thrown in front of the house
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News