अहिल्यानगर: तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात
Ahilyanagar Bribery Case: सदनिकेच्या खरेदीची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याकरिता ६ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी लाचेची रक्कम स्विकारताना अटक करण्यात आली.
कोपरगाव: सदनिकेच्या खरेदीची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याकरिता ६ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी गणेश वैजीनाथ सोनवणे याचा खासगी सहाय्यक करण नारायण जगताप याला तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्विकारताना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी कोपरगाव येथील साई रेसिडेन्सी या नावाचे इमारतीमधील पहिल्या मजल्यावर सदनिका खरेदी केलेली आहे. सदर सदनिकेच्या खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याकरिता तक्रारदार यांनी त्यांचा अर्ज व खरेदी खताची सूची क्र. २ ची छायांकित प्रत तलाठी गणेश सोनवणे यांच्याकडे जमा केली होती. सदनिकेच्या खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याकरिता तलाठी गणेश सोनवणे व खाजगी सहाय्यक करण जगताप हे ६ हजार ५०० रुपये लाचेची मागणी करत असल्याबाबतची तक्रार ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. त्यानुसार २ जानेवारी रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान खासगी सहाय्यक करण जगताप याने तक्रारदार यांच्या सदनिकेच्या खरेदी खताची नोंद सातबारा उताऱ्यावर लावण्याकरिता तलाठी सोनवणे याच्याकरिता ६ हजार रुपये व स्वतः करिता पाचशे रुपये असे एकूण ६ हजार ५०० रुपये लाचेची पंचासमक्ष मागणी केली.
२ जानेवारी रोजी साई रेसिडेन्सी अपार्टमेंट, कोपरगाव येथे सापळा लावून तक्रारदार यांच्याकडून करण जगताप यांनी पंचासमक्ष ६ हजार ५०० रुपये लाचेची रक्कम स्वीकारली. त्याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तसेच तलाठी गणेश सोनवणे याने करण जगताप यास तक्रारदार यांच्याकडे लाचेची रक्कम मागणी करण्यास प्रोत्साहन दिले व लाचेची रक्कम स्वीकारण्यास संमती दिली. याबाबत दोन्ही आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोहेकॉ संतोष शिंदे, पोना चंद्रकांत काळे, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड, पोहेकों हारून शेख यांच्या पथकाने कारवाई केली.
Web Title: Talathi in the net of bribery
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News