हिवरगाव पावसा टोलनाक्यावर जमावाकडून तिघा भावांना मारहाण
Breaking News | Sanamner Crime: वाहनाला धक्का दिल्याचे कारण काढून जमावाने तिघांना जबरी मारहाण केल्याची घटना घडली.
संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर रविवारी (दि.२९) मध्यरात्री वाहनाला धक्का दिल्याचे कारण काढून जमावाने तिघांना जबरी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांत तिघांसह आठ ते दहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की अतुल राधावल्लभ कासट (वय ४७, रा. संगमनेर) हे भाऊ अमित आणि मित्र अमरीश यांच्यासह वाहनातून जात असताना अमोल सरोदे, मंगेश फटांगरे, किरण रहाणे व इतर आठ ते दहा जणांनी गैरकायद्याने एकत्र येऊन गाडीने धक्का दिल्याचे कारण काढून शिवीगाळ, दमदाटी करीत धक्काबुक्की केली. याचवेळी अमोल सरोदे याने लोखंडी रॉडने डोक्यात मारुन मंगेश फटांगरे व किरण रहाणे यांनी भाऊ अमित व मित्र अमरीश यांना दगड व हातातील कड्याने मारुन दुखापत केली. सध्या जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमी अतुल कासट यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तिघांसह अनोळखी आठ ते दहा जणांवर भारतीय न्यायसंहिता कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. दिघे हे करत आहे.
Web Title: Sangamner Crime Three brothers beaten up by mob at Hivargaon rain toll booth
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News