Home अहमदनगर जामखेडच्या तरुणीचा मृतदेह हिंगोलीच्या जंगलात सापडला, प्रेमसंबधातून निर्घुण खून

जामखेडच्या तरुणीचा मृतदेह हिंगोलीच्या जंगलात सापडला, प्रेमसंबधातून निर्घुण खून

Crime News: तरुणीचा मृतदेह औंढा नागनाथच्या नागेशवाडीजवळील जंगलात सापडला, युवतीची गळा दाबून हत्या झाल्याचं निष्पन्न.

Jamkhed girl's dead body found in Hingoli forest, love affair murder

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील जिल्ह्यात 24 डिसेंबरला एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाची ओळख पटवून मारेकऱ्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या तरुणीचा मृतदेह औंढा नागनाथच्या नागेशवाडीजवळील जंगलात सापडला होता. पोस्टमॉर्टममध्ये या युवतीची गळा दाबून हत्या झाल्याचं निष्पन्न झालं.

कसा लागला सुगावा:

मृतदेहाची ओळख पटत नसल्यामुळे पोलिसांसमोर तपास करताना अनेक अडचणी येत होत्या. मुलीच्या मृतदेहाचे फोटो घेऊन पोलिसांनी राज्यातल्या सर्व पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली, पण तरीही काहीच सुगावा लागत नव्हता. अखेर पोलीस पुन्हा एकदा घटनास्थळी गेले तेव्हा त्यांना जंगलामध्येच एक बॅग आणि मॉलचं बिल सापडलं.

बॅगमध्ये सापडलेलं बिल संभाजीनगरच्या एका मॉलचं होतं, त्यानंतर पोलिसांनी संभाजीनगरचा हा मॉल गाठला आणि सगळी माहिती काढली. या माहितीमध्ये तरुणी अहमदनगरच्या जामखेडची असल्याचं समजलं. यानंतर औंढा नागनाथ पोलिसांची टीम जामखेडमध्ये तरुणीच्या घरी पोहोचली. पोलिसांनी त्यांच्याकडे असलेलं तरुणीचं छायाचित्र तिच्या घरच्यांना दाखवलं आणि घरच्यांनीही ही आमचीच मुलगी असल्याचं पोलिसांना सांगितलं. या तरुणीचं नाव अलका बाजीराव बेद्रे असल्याचं तपासात समोर आलं.

तरुणाला घेतलं ताब्यात:

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आणि नांदेड जिल्ह्यातल्या मुगटचा रहिवासी श्रीकांत सुरेश पिनलवार याला आदिलाबादमधून ताब्यात घेतलं.

कसा घडला घटनाक्रम:

अलका आणि श्रीकांत यांची प्रवासादरम्यान भेट झाली, या भेटीचं रुपांतर आधी मैत्रीत आणि मग प्रेमात झालं. मागच्या 9 महिन्यांपासून अलका आणि श्रीकांत एकत्र राहत होते, पण काही काळाने श्रीकांतने अलकावर संशय घ्यायला सुरूवात केली, त्यामुळे दोघांमध्ये भांडणं व्हायला सुरूवात झाली. ही भांडणं टोकाला गेल्यानंतर श्रीकांतने संभाजीनगरमध्ये एका भाड्याच्या खोलीत अलकाचा गळा दाबला आणि तिची हत्या केली. यानंतर श्रीकांतने अलकाचा मृतदेह औंढा नागनाथ तालुक्यातील नागेशवाडीजवळील जंगलात आणून फेकला.

Web Title: Jamkhed girl’s dead body found in Hingoli forest, love affair murder

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here