अकोले तालुक्यात पिकअपने दिलेल्या धडकेत मुलगा ठार
अकोले: अकोले तालुक्यात सुगाव फाटा परिसरात सावतानगरजवळ आज दिनांक ५ जुन शुक्रवार रोजी दुपारी पिकअपने मुलाला जोरदार धडक दिली. या धडकेत मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. साई सतीश शिंदे असे या मृत मुलाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुगाव फाटा परिसरात रस्त्याच्या कडेला चार वर्षाचा मुलगा खेळत असताना पिकअपने गाडी नंबर एम.एच.१७ बी.वाय. ५६४७ या गाडीने जोरदार धडक दिल्याने या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. साई सतीश शिंदे असे या मयत मुलाचे नाव आहे. या अपघातानंतर वाहन चालक पसार झाला आहे. ही गाडी रुंभोडी येथील फुल वाहतूक करणारी सफेद रंगाची आहे. या घटनेची पोलिसांनी नोंद केली आहे.
Website Title: News Akole Taluka boy was killed in a collision