अनैतिक संबंधाच्या कारणातून ठेकेदारावर कुर्हाडीने वार
Breaking Pune Crime News: अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन एकाने ठेकेदाराच्या डोक्यात कुर्हाडीने वार करून जखमी केल्याची घटना.
पुणे : भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अलीकडेच अनैतिक संबंधाच्या कारणातून हत्या झाली होती. पत्नी मोहिनी वाघ हिने आपला प्रियकर अक्षय जावळकर याला ५ लाखांची सुपारी देत ही हत्या घडवून आणली. अनैतिक संबंधातून झालेल्या हत्येची ही घटना ताजी असताना आता पुण्यात आणखी एक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन एकाने ठेकेदाराच्या डोक्यात कुर्हाडीने वार केले. ठेकेदाराच्या डोक्याजवळ मोठी जखम झाली असून नंतर त्याने वार हातावर झेलल्याने दोन्ही हातांना जखमा झाल्या आहेत.
रितेश लक्ष्मण परदेशी (वय ४८, रा. जयजवाननगर, येरवडा) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या फिर्यादीवरुन येरवडा पोलिसांनी उमेश रमेश वाघमारे (वय ३८, रा. बालाजीनगर, धनकवडी) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना येरवड्यातील जयजवाननगरमधील जय शक्ती मंडळाजवळ सोमवारी सकाळी सव्वा अकरा वाजता घडला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी परदेशी यांचा ठेकेदारीचा व्यवसाय आहे. व्यवसायाकरीता ते दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी वाटेत वाघमारे याने अडविले. लफडे करतो काय आज मी तुला जिवंत सोडणार नाही, तुला संपवतोच, असे म्हणून काही करण्याच्या आत त्याने कुर्हाडीने परदेशी यांच्या डोक्यात डाव्या भागावर जोरात मारले. परदेशी यांच्या डोक्यात जबर दुखापत झाल्याने ते दुचाकीसह खाली पडले. त्यानंतर वाघमारे याने कुर्हाडीने अनेक वार केले. त्यांनी जीव वाचविण्यासाठी दोन्ही हात मध्ये केल्याने कुर्हाडीने दोन्ही हातांना जखमा झाल्या आहेत. परदेशी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.
Web Title: Ax attack on contractor due to immoral relationship