बहिणीशी बोलला म्हणून कोयत्याने वार करत तरुणाला संपवलं
Baramati Braking News: चतुचंद कॉलेजच्या आवारातच एका विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना. या घटनेने बारामतीत खळबळ उडाली आहे.
बारामती : बारामतीत सहा महिन्यापूर्वीच तुळजाराम चतुचंद कॉलेजच्या आवारातच एका विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय रस्त्यावर 23 वर्षीय युवकाचा कोयत्याने निर्घृण वार करत खून करण्यात आला. गेल्या सहा महिन्यातील हा तिसरा खुनाचा प्रकार असून या घटनेने बारामती हादरली. बारामतीत गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. अनिकेत सदाशिव गजाकस या युवकावर कोयत्याने वार करण्यात आले. हातावर नाकावर, डोळ्यावर आणि मानेवर कोयत्याने जोरदार वार केल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अनिकेत हा मावस बहिणीशी बोलतो याचा राग येऊन तिघा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन अनिकेतचा मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेत अनिकेचा भाऊ अभिषेक सदाशिव गजाकस यांनी बारामती शहर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नंदकिशोर पंजाबराव अंभोरे, (रा प्रगतीनगर ता बारामती जि पुणे) 2) महेश नंदकुमार खंडाळे (रा. तांदुळवाडी रोड जिजामातानगर बारामती जि पुणे) 3) संग्राम खंडाळे (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी या आरोपींची नावे आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गजानन चेके करत आहेत.
Web Title: After talking to his sister, the coyote killed the young man by stabbing
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study