Home पुणे उपचारासाठी आलेल्या महिलेवर अत्याचार, डॉक्टरला अटक

उपचारासाठी आलेल्या महिलेवर अत्याचार, डॉक्टरला अटक

Pune Abused Case: खासगी उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या विवाहित महिलेवर,रुग्णालय तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी,पाटस पोलीसांनी वरवंड येथील डॉक्टरला अटक केली.

A doctor who abused a woman who came for treatment was arrested

पुणे | वरवंड: खासगी उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या विवाहित महिलेवर,रुग्णालय तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी,पाटस पोलीसांनी वरवंड येथील डॉक्टरला अटक केली आहे.ही माहिती पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली.डॉ.सुनिल नामदेव झेंडे ( मुळ रा. दिवे ता. पुरंदर जि. पुणे, सध्या रा. वरवंड ता. दौंड जि. पुणे) असे या आरोपीचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,वरवंड येथील धन्वंतरी अँक्युप्रेशर सेंटर आयुर्वेदिक दवाखान्याचा डॉक्टर सुनील झेंडे याच्या रुग्णालयामध्ये दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी पीडित महिला ही पाठीवर गाठ आल्याने उपचारासाठी दवाखान्यात गेली होती.

यावेळी आरोपी डॉक्टरने पीडित महिलेला ओढून घेऊन मिठी मारली.त्यावेळी तिने त्यांना डॉक्टर तुम्ही असे काय करता? मी माझे घरातील लोकांना सांगेल,असे म्हणाली असता, मला तु मला आवडतेस आपण दोघे बाहेर फिरायला जावु,असे म्हणाल्याने तिने त्यास नकार दिला.मात्र आरोपीने बळजबरीने धरून दवाखान्याच्या आतील खोलीत घेऊन अत्याचार केले.याबाबत कोणाला सांगु नकोस नाहीतर मी तुझी बदनामी करेन, अशी धमकी त्याने दिली.

त्यानंतर आरोपी डॉक्टरने २१ ऑगस्ट २०२४ ते १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले.पिडीतेने भितीपोटी अडीच तोळ्याचा सोन्याचा राणीहार घरात कोणास काहीएक न सांगता त्याला दिला.त्यानंतर दहा दिवसानंतर माझा सोन्याचा राणीहार मला परत दया,असे पिडीतेने सांगितले, पण सोन्याचा राणीहार डॉक्टरने दिला नाही.उलट वारंवार तुला तुझा राणीहार पाहीजे असेल,तर तु माझे सोबत शाररिक संबंध ठेव.नाहीतर मी तुझे घरात सांगेल अशी सारखी धमकी देत,पिडीत महिलेचा अडीच तोळ्याचा सोन्याचा,राणीहार बळकावला आहे असे फिर्यादीत नमूद केले आहे.

ही फिर्याद पीडित महिलेने पाटस पोलीस चौकीत दिल्याने मंगळवारी (दि.१०) संबंधित डॉक्टरवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित डॉक्टरला पाटस पोलिसांनी अटक केली असून बुधवारी (दि.११) दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची म्हणजे १६ डिसेंबर२०२४ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करीत आहेत.

Web Title: A doctor who abused a woman who came for treatment was arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here