Home नांदेड धक्कादायक!  इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या

धक्कादायक!  इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या

Breaking News | Suicide: अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या गेल्याची धक्कादायक घटना समोर.

Engineering girl Student commits suicide by hanging

नांदेड:  नांदेड येथील श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २१ वर्षीय तरूणी या महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून तिने वसतिगृहात आत्महत्या केली आहे. त्यामुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आत्महत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप समोर आले नाही.

आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव भक्ती शरदप्पा पिंगळे असून ती वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील रहिवासी आहे. भक्ती श्री गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्थेत स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होती. सकाळी तिच्यासोबत रुममध्ये राहणाऱ्या मैत्रिण बाहेर गेल्या होत्या. ती एकटी रूममध्ये असताना तिने पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

काही वेळाने बाहेर गेलेल्या मैत्रिणी रुमवर परतल्या त्यावेळी ही बाब लक्षात आली. गोंधळलेल्या विद्यार्थिनींनी ही घटना वसतिगृह प्रशासनाच्या लक्षात असून दिली. त्यानंतर काॅलेज प्रशासनाने नांदेड ग्रामीण पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चार जणांची टीम घटनास्थली दाखल झाली.  या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड हे तपास करीत आहेत.

Web Title: Engineering girl Student commits suicide by hanging

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here