स्वतःला भाई म्हणत महिलेवर कोयत्याने वार, चार जणांच्या टोळक्याने हल्ला
Pimpari Chinchwad Crime: महिलेवर कोयत्याचा वार केला.
पुणे: मोहननगर, चिंचवड येथे चार जणांच्या टोळक्याने एकत्र येत, स्वतःला भाई म्हणून घेत, गुरुवारी (दि. 5) रात्री साडेआठच्या सुमारास शस्त्राचा धाक दाखवत दहशत निर्माण केली. तसेच महिलेवर कोयत्याचा वार केला असून महिला थोडक्यात बचावली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सुमित कमलाकर दाभाडे (वय 21), अक्षय राजू कापसे (वय 20, दोघे रा. चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह सोन्या काळे, प्रतीक या आरोपींच्या विरोधात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मोहननगर येथे शतपावली करत असताना, चारही आरोपी दोन दुचाकींवरून मोठमोठ्याने हॉर्न वाजवत कोयते फिरवत आरडाओरडा करत आले. इथले भाई आम्हीच आहे. आमच्याशी भिडण्याची कोणाची हिम्मत नाही. कोणी आडवा आला तर डायरेक्ट 302, असे म्हणत त्यांनी दहशत निर्माण केली.
आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी महिलेच्या भाचीच्या अंगावर दुचाकी घातली. फिर्यादी आणि त्यांची भाची तिथून पळून गेल्या. या घटनेचा पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Calling himself Bhai, stabbed a woman with a spear
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study