पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या
Pune Suicide Case: स्वारगेट पोलीस वसाहतीत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.
पुणे : स्वारगेट पोलीस वसाहतीत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आत्महत्या मागील कारण अद्याप समोर आले नाही. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
ज्योती कैलास बर्डे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. कैलास बर्डे शहर पोलीस दलात नियुक्तीस आहेत. बर्डे दाम्पत्य स्वारगेट पोलीस वसाहतीत राहायला आहेत. शुक्रवारी दुपारी ज्योती आणि त्यांचा भाऊ घरी होता. ज्योती यांनी दुपारी अडीचच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्योती यांच्या भावाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा ज्योती यांनी आात्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली नसल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Policeman’s wife commits suicide
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study