सरबतामधून गुंगीचं औषध देत महिलेवर अत्याचार
Breaking News | Crime News: एका २३ वर्षीय तरुणीला गुंगीचं औषधं देत तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस.
डोंबिवली : डोंबिवलीमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणीला गुंगीचं औषधं देत तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. तरुणीला गुंगीचं औषधं देत तिच्या मनाविरुद्ध संबंध प्रस्थापित करणाऱ्या डोंबिवलीमधील प्रवीण पान्हेरकर (४२) याच्या विरोधात पीडित महिलेने विष्णूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. फेब्रुवारी ते नोव्हेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत व्यक्तीने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे.
प्रवीण याने पीडित तरुणीला नाष्टा खाऊ घातला. त्या नाष्ट्यात गुंगीचं औषधं टाकून सरबत पिण्यास दिलं. त्यानंतर संबंधिताने महिलेच्या मनाविरुध्द लैंगिक अत्याचार केले. तसेच तिचे फोटो – व्हिडिओ मोबाईलमध्ये काढून नंतर ते समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली. सततच्या लैंगिक अत्याचारामुळे महिला गर्भवती राहिली. यानंतर ही माहिती कोणालाही सांगू नकोस, नाहीतर तुझ्या आई-वडिलांना मी मारून टाकीन, अशीही त्याने महिलेला धमकी दिल्याचे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, आरोपीची यापूर्वी दोन लग्न झालेली असल्याची माहिती देखील त्याने पीडितेपासून लपवून ठेवली होती. दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पवार यांनी सांगितले. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. ए. लोखंडे अधिक तपास करत आहेत.
Web Title: Abuse of woman by giving gungi medicine from syrup