Home संगमनेर संगमनेर तालुक्याचा वनवास संपला अन…. आ. अमोल खताळ पाटील

संगमनेर तालुक्याचा वनवास संपला अन…. आ. अमोल खताळ पाटील

Breaking News | Sangamner Election: राजकारण बाजूला ठेवत विकासावर भर अमोल खताळ. (Amol Khatal)

exile of Sangamner taluka is over Amol Khatal

 

संगमनेर: संगमनेर तालुक्याचा वनवास संपला असून आता राजकारण बाजूला ठेवून मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये प्रलंबित समस्या आणि अडचणी सोडवत राजकारण बाजूला ठेवून विकासावर भर दिला जाईल, असे आश्वासन आ. अमोल खताळ पाटील यांनी दिले.

तालुक्यातील प्रती जेजुरी समजल्या जाणाऱ्या हिवरगाव पावसायेथील देवगड खंडोबाची महाआरती आ. खताळ आणि सौभाग्यवती निलम खताळ यांच्या हस्ते झाली. यावेळी देवगड देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणपत पावसे, उपाध्यक्ष

यादव पावसे, सचिव मोठ्याभाऊ बडे, विश्वस्त काशिनाथ पावसे, उत्तम जाधव, चंद्रशेखर गडाख, सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दबंगे, भाजप तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे, भाजप युवा मोर्चा शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे, अल्पसंख्यांकचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भालेराव यांच्यासह खंडोबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. खताळ म्हणाले, ज्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रत्येक गावात वाडीवस्तीवर घराघरात जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या, त्याचप्रमाणे मुंबईमधील शपथविधी झाल्यानंतर पुन्हा प्रत्येक गावात वाडीवस्तीवर घरो घरी जाऊन प्रत्येकाचे ऋण व्यक्त करत आहे. तालुक्याचा ४० वर्षापासून खुंटलेला विकास राजकारण बाजूला ठेवून सकारात्मक पद्धतीने करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मतदारसंघातील प्रत्येक गावाने आपल्याला भरभरून मतदान दिले. त्यामुळे ज्यांनी मतदान दिले, त्यांच्यासाठी काम करायचे आहे आणि ज्यांनी मतदान दिले नाही, त्यांच्यासाठी सुद्धा काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे मी आज सर्वत्र परिचित झालो आहे.

Web Title: exile of Sangamner taluka is over Amol Khatal

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here