संगमनेर: नायलॉन मांजाने तरुणाचा गळा व हात चिरला
Breaking News | Sangamner: युवक दुचाकीवरुन घरी जात असताना या मांजाने गळा व हाताची बोटे चिरल्याचा प्रकार घडला.
संगमनेर: पतंगासाठी वापरण्यात येणार्या नायलॉन मांजावर बंदी असतानाही सर्रासपणे त्याची विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. चंदनापुरी येथील युवक दुचाकीवरुन घरी जात असताना या मांजाने गळा व हाताची बोटे चिरल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे प्रशासनाने सतर्क होवून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे. राज्यात घातक असलेल्या नायलॉन मांजाला बंदी आहे. या मांजामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तरी देखील छुप्या पद्धतीने अनेक विक्रेते या मांजाची विक्री करत असल्याचे समोर येत आहे. नवीन वर्षाच्या आगमनापूर्वीच अनेक मुले व तरुण पतंग उडवत आहे.
परंतु, नायलॉन मांजा वापरत असल्याने तो अनेकांच्या जीवावर बेतत आहे. चंदनापुरी येथील निलेश रहाणे हा तरुण आपल्या दुचाकीवरुन सायंकाळच्या वेळी घरी चालला होता. दरम्यान, जोर्वे नाका ते अमरधाम परिसरात अचानक नायलॉन मांजाने गळ्याला विळखा घातला. हा विळखा काढत असताना गळ्याबरोबर हाताची दोन बोटे चिरली असून दहा टाके टाकली आहे. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्यापूर्वीच प्रशासनाने सतर्क होवून शहरातील मांजा विक्रेत्यांची झडती घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. याबाबतचे निवेदन स्वतः जखमी निलेश रहाणे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिले आहे.
Web Title: young man’s neck and hand were cut with a nylon manja
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study