माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला, शरद पवार काय म्हणाले?
Maharashtra assembly Election 2024: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आली. त्यातील एक दगड देशमुखांच्या डोक्याला लागल्याने ते जखमी.
Anil Deshmukh Attack: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सायंकाळी प्रचार आटोपून परत्त असताना जलालाखेडा मार्गावर त्यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आली. त्यातील एक दगड देशमुखांच्या डोक्याला लागल्याने ते जखमी झाले. त्यामुळे या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. देशमुख हे उपचारासाठी नागपूर येथे आले आहेत. दगडफेक करणारे भाजपचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी भाजपच्या घोषणा देऊन गाडीवर दगडफेक केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल देशमुख महाराष्ट्राचे आणि विशेषतः विदर्भाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्यावर दगडफेक करणं किंवा हल्ला करणं, असा प्रकार होईल, अशी चर्चा आम्ही यापूर्वी तिथं ऐकली होती. आम्ही या घटनेचा निषेध करतो, असे शरद पवार एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
अनिल देशमुख महाराष्ट्राचे आणि विशेषतः विदर्भाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्यावर दगडफेक करणं किंवा हल्ला करणं, असा प्रकार होईल, अशी चर्चा आम्ही यापूर्वी तिथं ऐकली होती. आम्ही या घटनेचा निषेध करतो, असे शरद पवार एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
तर सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती.
हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे, असे सुळे म्हणाल्या.
Web Title: Anil Deshmukh Attack Maharashtra assembly Election 2024
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study