Home अहमदनगर अहिल्यानगर: बहिणीला सासरी सोडवून आलेल्या भावावर काळाचा घाला

अहिल्यानगर: बहिणीला सासरी सोडवून आलेल्या भावावर काळाचा घाला

Breaking News | Ahilyanagar Accident: दोघा भावांच्या कारला वडाळा महादेव शिवारात मध्यरात्री अपघात झाला. या कार अपघातात तरूणाचा मृत्यू.

Accident Put time on the brother who rescued his sister-in-law

श्रीरामपूर:  श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथून बहीणीला नाशिक येथे पोहच करण्यासाठी गेलेल्या भोकर येथील दोघा भावांच्या कारला वडाळा महादेव शिवारात मध्यरात्री अपघात झाला. या कार अपघातात सागर खेत्री या तरूणाचा मृत्यू झाला. तर आकाश खेत्री हा गंभीर जखमी झाला. मयतावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गंभीर जखमीवर लोणी  येथील प्रवरा मेडीकल येथे उपचार सुरू आहेत.

भोकर येथे वेल्डींग व्यवसाय करणारे बाबासाहेब खेत्री यांचा मुलगा आकाश बाबासाहेब खेत्री (वय 28) व त्याचा चुलत भाऊ सागर लक्ष्मण खेत्री (वय 28) हे दोघे भाऊबीज सणासाठी आलेल्या बहिणीला आपली कार (नं.एमएच 14 एल बी 5854) हिने नाशिक येथे सोडविण्यासाठी गेले होते. तेथे बहीणीला पोहच करून घरी भोकर येथे परत येत असताना, सोमवार दि.11 नोव्हेबरच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास श्रीरामपूर- नेवासा महामार्गावर वडाळामहादेव शिवारात त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात सागर लक्ष्मण खेत्री या तरूणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर कार चालक आकाश खेत्री याच्या कमरेला, मानेला व डोक्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मध्यरात्री अपघात होवूनही गंभीर जखमीस वेळेत मदत मिळाल्याने आकाश बचावल्याची परीसरात चर्चा सुरू होती.

वडाळा महादेव शिवारात राज्यमार्गालगतच्या झाडांना तोडून दुसर्‍या झाडात त्यांची कार गुंतलेली होती. हा अपघात कशामुळे व कसा झाला हे समजू शकले नाही. अपघात घडल्याचे समजताच वडाळा महादेव येथील पवार कुटुंंबाने भोकर येथे त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहीती दिली. तत्काळ गंभीर जखमीस श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पीटल येथे उपचारासाठी रवाना केले, तेथून त्यास लोणी येथील प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या हॉस्पीटलमध्ये दाखल केले. लोणी येथूनही पुढील उपचारासाठी त्यास नाशिक येथील एसएमबीटी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तर मयत सागर खेत्री याचे शवविच्छेदनानंतर त्याच्यावर भोकर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत सागर हा गं.भा. बेबी लक्ष्मण खेत्री यांचा एकुलता एक मुलगा होता, त्याचा गेल्या सहा महिन्यापुर्वीच विवाह झालेला होता, त्याच्या अपघाती निधनाने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई, आजी, आजोबा, दोन चुलते व चुलती असा परीवार आहे. या प्रकरणी शहर पोलीसांत अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संतोष परदेशी हे करत आहेत.

Web Title: Accident Put time on the brother who rescued his sister-in-law

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here