अकोलेत महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार ,गुन्हा दाखल
Breaking News | Akole Crime: घटस्फोटित महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
अकोले एका ३० वर्षीय घटस्फोटित महिलेवर अकोले तालुक्यातील गर्दणी घाट, संगमनेर तालुक्यातील कन्हे घाट, गुंजाळवाडी रोड येथे काळ्या रंगाच्या कारमधून घेऊन जाऊन अत्याचार केल्याची तक्रार अकोले पोलिसांत दाखल झाली असून आरोपी संजय दादापाटील वाकचौरे (रा. पिंपळगाव निपाणी, तालुका अकोले) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अकोले पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एका ३० वर्षीय घटस्फोटित महिलेने आरोपी संजय दादापाटील वाकचौरे याच्या विरूद्ध अकोले पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की आरोपी संजय
वाकचौरे याने तुला बाजार करून देतो, असे म्हणून काळ्या रंगाच्या कारमध्ये गर्दनी घाटात दाट सीताफळाच्या झाडीत नेऊन अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा अशाच पद्धतीने बाजारहाट करून देतो असे सांगून संगमनेरमार्गे कर्हे घाटात नेऊन तेथे मंदिराच्या बाजूला नेऊन अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा असेच कारण करून संगमनेर येथे गुंजाळवाडी रोडला अत्याचार केले. अशी तक्रार पीडित महिलेने अकोले पोलिसांत दिली असून आरोपी संजय वाकचौरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अकोले पोलीस करीत आहेत.
Web Title: case has been registered in the case of abused against a divorced woman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study