अहिल्यानगर: विहिरीत आढळला दगड बांधलेला बेवारस मृतदेह
Breaking News | Ahilyanagar: कालव्यानजीक असलेल्या एका विहिरीत तरंगत असलेल्या अवस्थेत एक अनोळखी मृतदेह आढळून आल्याची घटना.
शेवगाव: शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी शिवारातील कालव्यानजीक असलेल्या एका विहिरीत तरंगत असलेल्या अवस्थेत एक अनोळखी मृतदेह आढळून आला. सदरील प्रकार शनिवारी (दि.९) सकाळच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सदरील व्यक्तीची ओळख पटवून पुढील तपास सुरू असल्याचे बोधेगाव पोलिस चौकीचे सहायक फौजदार राजू ससाणे यांनी सांगितले.
मृतदेहाच्या कंबरेला दाव्याच्या साहाय्याने मोठा दगड बांधलेला आढळून आला आहे. हा प्रकार घातपात आहे की आत्महत्या, अशी नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू आहे. पिंगेवाडी येथील बाबासाहेब नारायण मुंडे यांच्या गट नंबर १०४ शिवारातील कालव्यानजीकच्या शेतात असलेल्या विहिरीत शनिवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास बाबासाहेब मुंडे यांचा मुलगा शेतकरी सतीश मुंडे व त्यांची पत्नी कापूस वेचणी करत असताना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यावेळी त्यांनी विहिरीचे मालक हरिभाऊ गाढे (रा. लखमापुरी, ता. शेवगाव) यांना सदरील प्रकार फोनवरून सांगून याविषयी माहिती दिली; परंतु गाढे यांनी मी साधारण तीन महिन्यांपासून तिकडे फिरकलो नसल्याचे सांगितले. त्यानंतर सतीश मुंडे यांनी बोधेगाव पोलिस चौकीतील पोलिसांना फोनवरून घटनेची खबर दिली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. या घटनेने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
Web Title: stone-bound dead body was found in a well
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study