प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून सुऱ्याने तरुणीची निर्घुण हत्या
Breaking News | Love Affair: २३ वर्षीय तरुणीने २४ वर्षीय शेजाऱ्यास प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने सुऱ्याने तरुणीची निघृण हत्या केल्याची घटना.
भिवंडी: २३ वर्षीय तरुणीने २४ वर्षीय शेजाऱ्यास प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून तरुणाने सुऱ्याने तरुणीची निघृण हत्या करून मोठ्या बहिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या लहान बहिणीलाही सुऱ्याने वार करून गंभीर जखमी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना भादवड गावातील कानिफनाथ मंदिराजवळील कृष्णानगर मधील एका चाळीत घडली आहे.
याप्रकरणी खून करणाऱ्या आरोपीच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर तो फरार झाला आहे. नितु सिंग (२३) असे मयत झालेल्या पीडित तरुणीचे नाव आहे. तर राजू महेंद्र सिंग (२४) असे हत्या करणाऱ्या आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हत्यारा हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून मयत तरुणी मूळची उत्तर प्रदे शातील भदोई जिल्ह्यातील ग्राम नेवादा (दुरस्ता) मधील असून सद्यस्थितीत कुटुंबासोबत येथील भादवड गावातील कृष्णानगर मधील भरत तरे यांच्या चाळीतील एका भाड्याच्या खोलीत राहत आहे. आणि आरोपीही मयत तरुणीच्या शेज- भानारी राहत आहे.
दरम्यान तरुणीने शेजाऱ्याला प्रेमसंबंधास नकार दिला होता. याच रागातून २८ ऑक्टोबर रोजी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास राजूने नितु घरी एकटी असताना भाजी कापण्याच्या सुऱ्याने नितुच्या शरीरावर सपासप वार करून तिची निघृण हत्या केली आहे. यासह मयत नितुची लहान बहिण रितूने नितुला वाचवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने रीतुच्या बोटाजवळ सुऱ्याने वार करून तिलाही जखमी केले आहे. याप्रकरणी मयत नितुच्या वडिलांच्या फिर्यादीवरून भान्यासं कलम १०३, ३३३, ११८(१) सह मपोकाक ३७ (१), १३५ न्वये राजूच्या विरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांची कुणकुण लागताच राजू घटना स्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा सीसीटिव्हीच्या आधारे कसून शोध घेत आहेत. अधिक तपास पोनि (गुन्हे) अतुल अडुरकर करीत आहेत.
Web Title: Surya brutally killed a young woman out of anger for refusing a relationship
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study