संगमनेरची दहशती संस्कृती जनता सहन करणार नाही
Maharashtra assembly elections 2024: सभा संपल्यानंतर माझ्यावरच हल्ला करण्याचा कट होता. थोरात समर्थक कार्यकर्त्यांनी सभेसाठी उपस्थित असलेल्या महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडून आणि जाळून दहशतीचे खरे दर्शन राज्याला घडविले. Sujay Vikhe Patil.
संगमनेर: धांदरफळ येथील सभा संपल्यानंतर माझ्यावरच हल्ला करण्याचा कट होता. थोरात समर्थक कार्यकर्त्यांनी सभेसाठी उपस्थित असलेल्या महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडून आणि जाळून दहशतीचे खरे दर्शन राज्याला घडविले आहे.
तालुक्यातील आमच्या कार्यकर्त्यांवर असाच अन्याय कराल तर तुमची दहशत मोडून काढण्यासाठी जनता अशीच रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही असा इशारा डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिला.
धांदरफळ येथील सभेनंतर झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी संगमनेर आणि राहाता तालुक्यातील महायुतीच्या पदाधिका-यांनी बोलविलेल्या सभेत डॉ.सुजय विखे पाटील यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले असले तरी, त्यांनी पुन्हा थोरातांच्या दहशतीच्या प्रवृत्तीवर कठोर टिका करुन, कार्यकर्त्यांना मारहान करणा-या, गाड्या जाळणा-या कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले नाही तर, रविवारी दुपारी ३ वाजता संगमनेरात निषेध मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेमध्ये वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचा मी तातडीने निषेध केला. त्या वक्तव्याचे समर्थनही होवू शकत नाही. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी, हीच माझी भूमिका आहे. मात्र या घटनेच्या आडून आमच्या अंगावर येण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर, आम्हीही सहन करणार नाही. तालुक्यात सभांना मिळणा-या प्रतिसादामुळे अस्वस्थ झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अतिशय तयारीने माझ्यावरच हल्ल्याचा कट केला होता. सभा सुरु असतानाच याची माहीती मला मिळाली.
त्यामुळे त्या ठिकाणी अधिक उद्रेक होवू नये म्हणून मी कार्यकर्त्यांसहीत तेथून बाहेर पडलो. मात्र रस्त्यात ठिकठिकाणी थांबलेल्या थोरात समर्थकांनी महिला आणि कार्यकर्ते बसले असलेल्या गाड्या नियोजन बध्द पध्दतीने आडवून तोडफोड केली, गाड्या जाळण्यासाठीचे साहित्य त्यांच्याकडे तयारच असल्याने गाड्याही पेटविण्यात आल्या. या सर्व गोष्टी अचानक होवू शकत नाही त्यामुळेच हे ठरवून केलेले षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी आपल्या भाषणात केला. ही संगमनेरची दहशती संस्कृती राहाता तालुक्यातील जनता सहन करणार नाही. तुम्हालाही जशास तसे उत्तर देण्याची तयारी आमची आहे.
हल्ला झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना आपण दिलासा दिला असून, तालुक्यातील ही दहशत संपविण्यासाठी आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असे स्पष्ट करुन, डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, गाड्यांवर आणि कार्यकर्त्यांवर हल्ले करणा-यांवर आधिच कारवाई होण्याची गरज होती. मात्र याचे गांभिर्य प्रशासनाने दाखविले नाही. नाईलाजास्तव प्रशासनाच्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावे लागणार आहे. कालच्या घटनेचे गांभिर्य निवडणूक आयोगानेही घ्यावे. याचे सविस्तर निवेदन आम्ही आयोगाकडे देणार असल्याची माहीती त्यांनी आपल्या भाषणात दिली.
डॉ.सुजय विखे पाटील यांच्यावर हल्ला करण्याच्या कटकारस्थानाचा उपस्थित कार्यकर्त्यांनी तिव्र शब्दात निषेध केला. लोणी बुद्रूक येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको करुन, कालच्या घटनेविरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा तिव्र शब्दात निषेध करुन, डॉ.सुजय विखे पाटील यांच्यावर हल्ल्याचा कट हा निंदनिय आहे. आमची संस्कृती खुप वेगळी आहे. डॉ.सुजय विखे पाटील चांगल्या संस्कारात वाढले आहेत. तोही मेलेल्या आईचे दुध पिलेला नाही अशा शब्दात त्यांनी थोरात समर्थकांचा समाचार घेतला.
देशमुख यांचे वक्तव्य राजकीय षडयंत्र – पालकमंत्री विखे
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे डॉ.सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प सभेत वसंतराव देशमुख यांनी केलेले वक्तव्य म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय आहे, असे ट्विट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. देशमुख यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. सभेला मिळणारा प्रतिसाद पाहून डॉ.सुजय विखे यांच्यावरही हल्ला करण्याचा हल्लेखोरांचा प्रयत्न होता. संगमनेर तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी मी करत आहे, असं ना.विखे पाटील म्हणाले.
Web Title: People will not tolerate Sangamner’s culture of terror
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study