संगमनेरात दोन ठिकाणी वेश्याव्यवसायावर छापा, दोन महिलांची सुटका
Breaking Sangamner Prostitution: वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या दोन ठिकाणी संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी आणि संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई, पाच जणांवर कारवाई, दोन महिलांची सुटका.
संगमनेर : वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या दोन ठिकाणी संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी आणि संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई केली. नाशिक आणि पुणे येथील दोन ३० वर्षीय पीडित मुलींची सुटका यावेळी करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (दि.२४) रात्री शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुंजाळवाडी गावच्या शिवारातील निर्मलनगर आणि राजापूर-घुलेवाडी रस्त्याला अशा दोन ठिकाणी करण्यात आली.
.गुंजाळवाडी शिवारात निर्मलनगर परिसरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळाली. पोलिसांनी डमी ग्राहक तेथे पाठविले, त्यांच्याकडे पैसेही दिले होते. ते पैसे घेऊन डमी ग्राहक बंगल्यांमध्ये गेले. त्यांच्या पाठोपाठ पोलिस तेथे पोहोचले. कारवाईसाठी गेलेल्या दोन्ही बंगल्यांमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले.
त्या ठिकाणी कुंटनखाना सुरू असल्याचे सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून तेथून ३१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या दोन्ही प्रकरणात एक गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. तर, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
त्यात दोन महिलांचा समावेश आहे. प्रवीण देवराम वाकचौरे (वय ४१, रा. पिंपळगाव निपाणी, ता. अकोले), धीरज नवनाथ भागवत (वय ३०, रा. साठेनगर, घुलेवाडी, ता. संगमनेर), स्वप्निल गोफणे (वय २२, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) तसेच ३१ आणि २८ असे वय असलेल्या दोन महिला अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरोधात सहायक पोलिस निरीक्षक सोनल फडोळ यांनी फिर्याद दिली आहे
Web Title: Prostitution raids at two places in Sangamnera, two women freed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study