अहिल्यानगर: या हॉटेलमध्ये सुरु होता वेश्या व्यवसाय; पोलिसांनी छापा, तीन महिलांची सुटका
Breaking News | Ahmednagar: न्यू भारत हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन महिलांची सुटका केली असून, या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल.
अहिल्यानगर : नगर-राहुरी रोडवरीन न्यू भारत हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन महिलांची सुटका केली असून, या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी खुर्द येथील एका हॉटेलवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर नगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व राहुरी पोलीस ठाण्यातील पथकाने सयुंक्त कारवाई करून 3 पिडीत महिलांची सुटका केली आहे. तसेच वेश्या व्यवसाय करून घेणार्या दोन आरोपींना अटक केली आहे.
विक्रम सुरेश विशनानी (वय २७, रा. तनपुरेवाडी, ता. राहुरी), फराद अहम्मद सय्यद (वय ३८, रा.राहुरी) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत. नगर-राहुरी रोडवरील न्यू भारत हॉटेल येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. बनावट ग्राहक बनून पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकला. त्यावेळी तिथे तीन महिला मिळून आल्या. ग्राहकांकडून पैसे घेऊन वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती महिलांनी दिली. वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण २१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, संदीप दरंदले, संतोष खैरे, विशाल तनपुरे आदींच्या पथकाने केली.
Web Title: prostitution business was taking place in the hotel; Police raid, three women freed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study