महायुतीला मोठा धक्का, बडा नेता आपल्या पक्षासह महायुतीतून बाहेर
Maharashtra Vidhansabha Election 2024: महायुतीमधून पहिला मित्रपक्ष बाहेर पडला.
Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर 24 तासांमध्येच महायुतीला पहिला धक्का लागला आहे. महायुतीमधून पहिला मित्रपक्ष बाहेर पडला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर महायुतीच्या बाहेर पडले आहेत. (Mahadev Jankar)
प्राथमिक माहिती अशी की, आमदारकीची टर्म पुन्हा न मिळाल्यामुळे महादेव जानकर नाराज होते. महायुतीमधून बाहेर पडल्यानंतर महादेव जानकर विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहेत. आज झालेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेलाही महादेव जानकर उपस्थित नव्हते.
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महादेव जानकरांसाठी एक जागा सोडली होती. परभणीमधून महादेव जानकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, पण त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. लोकसभा निवडणुकीवेळीही महादेव जानकर महाविकासआघाडीसोबत जायच्या तयारीत होते, यासाठी त्यांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चाही सुरू होती, पण शेवटच्या क्षणी महादेव जानकर यांनी महायुतीसोबत जायचा निर्णय घेतला होता.
Web Title: big blow to the grand alliance, Bada leader out of the grand alliance with his party
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study