Home पुणे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने डोक्यात सिलिंडर घालून निघृणपणे हत्या

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने डोक्यात सिलिंडर घालून निघृणपणे हत्या

Breaking News | Pune Crime: चारित्र्यावर संशय घेत एका निर्दयी पतीने डोक्यात सिलिंडर घालून तिची अत्यंत निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना.

Suspecting his wife's character, the husband put a cylinder on her head

पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका निर्दयी पतीने डोक्यात सिलिंडर घालून तिची अत्यंत निघृणपणे हत्या केल्याची  धक्कादायक घटना पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. माधुरी मनोहर मोरे (वय ४७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

धानोरीतील मुंजोबा वस्ती लेन नंबर १० या ठिकाणी हा प्रकार घडला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी मनोहर याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये सातत्याने भांडण होत होते. रविवारी रात्रीच्या सुमारास दोघामध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद इतका विकोला गेला की, आरोपी मनोहर याने माधुरीच्या डोक्यात सिलिंडर घातला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पत्नी माधुरीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सोमवारी सकाळी स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत माधुरीचा मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी मनोहर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Suspecting his wife’s character, the husband put a cylinder on her head

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here