Home अकोले अकोले तालुक्यात तिसरा करोना रुग्ण आढळला

अकोले तालुक्यात तिसरा करोना रुग्ण आढळला

अकोले: अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे एक ३९ वर्षीय तरुण हा परगावीहून आलेला आहे. त्याला करोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्याच्या बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे अकोले तालुक्यातील करोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. समशेरपूर येथे मुलूंड येथून आलेल्या एका 39 वर्षीय तरुण पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे अकोले तालुक्यात हा तिसरा रूग्ण झाला आहे. हा तरुण 19 मे रोजी गावात आला होता. त्यानंतर त्यास काल जास्त त्रास होऊ लागल्याने त्याला उपक्रेंद्रात पाठविण्यात आले होते.

मात्र,  त्यास जास्त त्रास होत असल्यामुळे त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. आज उशिरा त्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला यात त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगर जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांमुळे करोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे.

Website Title: Coronavirus Akole taluka third patient

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here