Home पुणे धक्कादायक! मोबाईलचे पैसे मागितल्याने तरुणाचा चाकूने भोसकून खून

धक्कादायक! मोबाईलचे पैसे मागितल्याने तरुणाचा चाकूने भोसकून खून

Breaking News | Pune Crime: मोबाईलचे पैसे मागितल्याने तिघा जणांनी मिळून तरुणाच्या पाठीत चाकूने भोसकून ठार मारल्याची घटना.

young man was stabbed to death for asking for money for a mobile phone

पिंपरी: मोबाईलचे पैसे मागितल्याने तिघा जणांनी मिळून तरुणाच्या पाठीत चाकूने भोसकून ठार मारल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी एका महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रमेश कांबळे, देवा कांबळे (दोघे रा. महादेवनगर, भोसरी) आणि त्यांच्या साथीदारावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भोसरी येथील सार्वजनिक रोडवर सोमवारी रात्री अकरा वाजता घडली. आकाश परदेशी (वय २८) असे खून झालेल्याचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की,  कार्तिक साबे याने मोबाईलचे पैसे रमेश कांबळे याच्याकडे मागितले, या कारणावरुन रमेश कांबळे याने लोखंडी कड्याने कार्तिक साबे व आकाश परदेशी यांना मारहाण केली. देवा कांबळे याने लोखंडी रॉडने आकाश परदेशी व जयेश पटेकर यांना मारहाण केली. त्यांच्या साथीदाराने तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रमेश कांबळे याने आकाश परदेशी याच्या पाठीत चाकूने भोसकून त्याला ठार मारले. त्यानंतर कार्तिक व जयेश यांना शिव्या देऊन आमचे नादी लागला आणि पोलिसात तक्रार केली तर तुम्हाला पण ठार मारतो, अशी धमकी दिली. त्यानंतर ते बुलेटवर बसून निघून गेले. सहायक पोलीस निरीक्षक नितीन अंभोरे तपास करीत आहेत.

Web Title: young man was stabbed to death for asking for money for a mobile phone

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here