महिला अत्याचार प्रकरणी माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्याबाबत नवीन अपडेट
Breaking News | Ahmednagar: सात तासांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने मुरकुटे यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश.
राहुरी| श्रीरामपूर : माजी आमदार भानुदास मुरकुटे (वय ८२) यांनी राहुरी तालुक्यातील एका ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी मुरकुटे यांना त्यांच्या श्रीरामपूर येथील निवासस्थानातून सोमवारी मध्यरात्री अटक केली. मंगळवारी दुपारी त्यांना राहुरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी मुरकुटे यांना त्यांच्या श्रीरामपूर येथील निवासस्थानातून सोमवारी मध्यरात्री अटक केली. मंगळवारी दुपारी त्यांना राहुरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सात तासांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने मुरकुटे यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिसांनी अत्यंत गोपनीयतेने मध्यरात्री ही कारवाई केली. दीड ते दोन तासांच्या नाट्यमय घडामोडीनंतर पोलिसांनी मुरकुटे यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांचे वकीलही उपस्थित होते.
मुरकुटे यांनी २०१९ पासून तर २०२३ पर्यंत आर्थिक आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केले. जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी, मुंबई तसेच दिल्ली येथे नेऊन लैंगिक अत्याचार केले. त्यांनी जमीन, बंगला श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना मंगळवारी दुपारी राहुरी येथील न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनीही न्यायालय आवारात गर्दी केली होती. घेऊन देण्याचे आमिष दाखविले, असे फिर्यादित म्हटले आहे. मुरकुटे यांची राहुरी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मंगळवारी सकाळी छातीत त्रास जाणवल्याची तक्रार त्यांनी केली. त्यामुळे त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तब्बल सात तास युक्तीवाद करण्यात आला. त्यांच्या वकिलांनी ही अटकच बेकायदेशीर असल्याचा युक्तीवाद केला. त्यावर न्यायालयाने पोलिस व सरकारी वकिलांचे लेखी म्हणणे मागविले.
Web Title: New update on former A. Bhanudas Murkute in the case of women Rape
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study