युवतीची आत्महत्या, प्रियकरावर गुन्हा दाखल
Breaking News | Mumbai Crime: आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
मुंबई : जोगेश्वरी येथील निकिता मनोहर लोंढे या 21 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केली. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी तिचा प्रियकर हर्ष राऊत याच्याविरुद्ध निकिताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
निकिता ही तिच्या आई-बहिण आणि भावासोबत जोगेश्वरी येथे राहत होती. तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. चार वर्षांपासून तिचे हर्षसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, त्यांच्या या प्रेमसंबंधाला निकिताच्या आई तसेच भावाचा विरोध होता. तरीही निकिता आणि हर्ष यांच्यातील प्रेमसंबंध सुरू होते. शेवटी नाईलाजास्तव निकिताच्या आईने त्यांच्या लग्नाला संमती दिली. मात्र, सोबत हर्षला त्याच्या कुटुंबियांची परवानगी घेण्यास सांगितले होते.
गणेशतोत्सवापूर्वी म्हणजेच 6 सप्टेंबरला याच कारणावरून निकिता आणि हर्ष यांच्यात वाद झाला. त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या निकिताने त्याच्यासोबत भांडण केले. त्यामुळे हर्षने तिला बेदम मारहाण केली. याच्या धक्क्याने तेव्हापासून निकिता प्रचंड मानसिक तणावात होती. आणि गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 7 सप्टेंबरला तिने घरातच उंदीर मारण्याचे औषध घेतले. हे घरातल्यांच्या लक्षात येताच तिला तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिथे उपचारादरम्यान तिची प्रकृती ढासळली. त्यामुळे तिला पुढील उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या धावपळीचा काहीही उपयोग झाला नाही आणि 9 सप्टेंबरला निकिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Web Title: suicide of young woman in Jogeshwari
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study