अहमदनगर: भूमी अभिलेखचा निमतानदार चतुर्भुज लाच घेताना जाळ्यात
Breaking News | Ahmednagar: शेतकर्याकडून 10 हजाराची लाच घेताना पाथर्डी येथील उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदाराला नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
अहमदनगर: लाच घेण्याच्या जिल्ह्यात वारंवार घटना समोर येत असताना आणखी एक लाच प्रकरण समोर आले आहे. शेतकर्याकडून 10 हजाराची लाच घेताना पाथर्डी येथील उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदाराला नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. संजय भिमराव मनवरे (वय 56 रा. भगवाननगर, पाथर्डी) असे पकडलेल्या निमतानदाराचे नाव आहे. त्याच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील शेतकर्याच्या शेत जमिनीच्या झालेल्या मोजणीचा अहवाल व नकाशा न्यायालयात सादर करण्याकरिता संजय मनवरे याने लाच मागणी केल्याची तक्रार शेतकर्याने नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
See also: Learn English
सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाने 18 सप्टेंबर रोजी लाच मागणी पडताळणी केली असता संजय मनवरे याने तक्रारदाराकडे पंचासमक्ष 25 ते 30 हजार रुपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता 10 हजार रुपये स्वीकारण्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, लाचलुचपत विभागाने 3 ऑक्टोबर रोजी सापळा लावून संजय मनवरे याला तक्रारदारांकडून 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. सदरची कारवाई लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार चंद्रकांत काळे, उमेश मोरे, बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे, दशरथ लाड यांच्या पथकाने केली आहे.
Web Title: Nimthandar of Bhumi Records Quadruped caught in bribery
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study