विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघे दगावले
Sangali Electric Shock: विजेचा शॉक लागून वनमोरे कुटुंबातील तिघांचा मृत्यू.
म्हैसाळ | सांगली: म्हैसाळ (ता. मिरज) येथे विजेचा शॉक लागून वनमोरे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत एक मुलगा जखमी असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी सकाळी घडली.
प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे (वय ३५), पारसनाथ वनमोरे (४०), शाहिराज पारसनाथ वनमोरे (१२) अशी मृतांची हा मुलगा जखमी झाला आहे. म्हैसाळ येथील सुतारकीमाळ परिसरात वनमोरे कुटुंबीयांची शेती आहे. शेतात गेले असता, विजेची तार तुटून शेतात पडली होती. त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांचा मुलगा शाहिराज वनमोरे हा पारसनाथ यांच्याकडे गेला होता. शाहिराज यालाही शॉक लागला.
Web Title: Three members of the same family died due to electric shock
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study