Home अहमदनगर अहमदनगर: शाळकरी मुलीचे अपहरण..पुढच्या काही तासात थेट रायगड जिल्ह्यात

अहमदनगर: शाळकरी मुलीचे अपहरण..पुढच्या काही तासात थेट रायगड जिल्ह्यात

Breaking News | Ahmednagar: नगर शहरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण, आरोपी अल्पवयीन असून, त्याला ताब्यात.

Abduction of school girl..directly in Raigad district in next few hours

अहमदनगर: बदलापूर येथील घटना गाजत असतानाच नगर शहरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. कोतवाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पीडित मुलीची रागयड जिल्ह्यातून सुटका केली.

आरोपी अल्पवयीन असून, त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अवघ्या १२ तासांत शोध घेत तिची सुटका करण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीसह पिडीत मुलीला बुधवारी (दि.२१) रात्री रायगड जिल्ह्यातील कर्जत रेल्वेस्थानकावर तेथील रेल्वे पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. यातील आरोपी हा ही अल्पवयीन निघाला आहे.

केडगाव उपनगरातून एक १४ वर्षांची मुलगी मंगळवारी (दि.२०) सकाळी १० च्या सुमारास दुकानात गेली असता ती बराच वेळ घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून न आल्याने तिला एका संशयिताने पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या आईने मंगळवारी मध्यरात्री कोतवाली पोलिस ठाण्यात दिली होती.

या घटनेचे गांभीर्य ओळखून शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या सूचनेनुसार पो.नि. प्रताप दराडे यांनी एक पथक नेमून त्यामार्फत सदर मुलीचा सर्वत्र कसून शोध सुरु केला. या पथकाकडे संशयित आरोपी बाबत कोणतीही माहीती नसतांना बेसीक पोलिसिंग वापर करुन आरोपींचे नातेवाईक व जवळचे मित्र यांच्याकडे बारकाईने तपास करीत असता त्यातील एका मित्राला आरोपीने एका अनोळखी नंबर वरून फोन करत पैशाची मागणी केली.

पोलिसांना हे समजताच त्यांनी त्या मित्रांकडे अधिक चौकशी करत बारकाईने तपास केला असता पिडीत मुलगी व आरोपी हे कर्जत रेल्वे स्टेशन जि. रायगड येथे असल्याची माहिती मिळाली. या पथकाने तत्काळ कर्जत येथे जावुन तेथील रेल्वे पोलीसांची मदत घेवुन सदर पिडीत मुलगी व आरोपीला बुधवारी रात्री ताब्यात घेतले. सदर आरोपी हा ही अल्पवयीन असल्याचे तपासात समोर आले. हे दोघे नगरहून कोपरगाव तेथून दौंड तेथून मुंबई कल्याण व कर्जत येथे गेल्याचे पोलिस तपासात पुढे आले.

Web Title: Abduction of school girl..directly in Raigad district in next few hours

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here