अहमदनगर: परतीच्या पावसाचा जिल्ह्यात हाहाकार
Breaking News | Ahmednagar Rain Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने नगरसह हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी.
अहमदनगर: पाऊस आता परतीच्या प्रवासातही रौद्ररुप धारण करू लागला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने नगरसह हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळे नुकसान झाले आहे. कालही श्रीरामपुरात जोरदार पाऊस सुरू होता. अकोले तालुक्यातही या पावसाने जोरदार दणका दिला आहे.
संगमनेर तालुक्यातील बोटा ते अकलापूर या दोन गावांना जोडणार्या केळेवाडी येथील बाडगीच्या ओढ्यातील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे वरील गावांचा संपर्क तुटला असून सर्व वाहतूक ही घारगाव मार्गे वळविण्यात आली आहे. मुळा पाणलोटात पाऊस सुरू असल्याने या धरणातून काल सकाळी 3000 क्युसेककने पाणी सोडणे सुरू होते.भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे आवक वाढल्यास या धरणातूनही पाणी सोडण्यात येत आहे. देवळाली प्रवरा येथील श्रीरामपूर रस्त्यावरील शेखराज महाराज मंदिरालगत असलेल्या नवनाथ चव्हाण यांच्या घरावर रात्री वीज कोसळली, घराला तडे गेले. घरालगतच्या नाराळाच्या जावळ्या करपल्या, मात्र जिवीत हनी झाली नाही.
Web Title: Return rains wreaked havoc in the Ahmednagar
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study