अहमदनगर: मुलीला फूस लावून पळविणारा जेरबंद
Breaking News | Ahmednagar: एका गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावत पळवून नेणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात राहुरी पोलिसांना यश.
राहुरी : तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावत पळवून नेणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. १२ ऑगस्ट रोजी बस स्थानक हद्दीतून पहाटे ३ वाजता अल्पवयीन मुलीसह आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. संकेत राजेंद्र दुधाट (२२, रा. म्हैसगाव, ता. राहुरी) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
२७ जुलै रोजी आरोपीने अल्पवयीन मुलीला फूस लावत पळवून नेले होते. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी अल्पवयीन मुलीचा छडा लावण्यासाठी तत्काळ पोलिस पथक तैणात केले होते. पोलिस आरोपीच्या शोधात असताना तो मुलीसह बस स्थानक हद्दीत असल्याचे समजले. पहाटे ३ वाजता पोलिसांनी बस स्थानक गाठले असता, आरोपी पलायण करण्याच्या तयारीत असताना शिताफिने पकडला. पीडित मुलीला पालकांच्या स्वाधीन केले आहे. आरोपीविरुद्ध पोलिस उप निरीक्षक समाधान फडोळ, पोलिस हवालदार जानकीराम खेमनर, रामनाथ सानप, रविंद्र कांबळे व अनिनाण तथाटे गांनी कारवाई केली.
Web Title: Prisoner who seduced the girl and abducted her
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study