Home राहाता पती-पत्नीच्या तोंडावर स्प्रे मारुन सव्वातीन लाखांचे दागिने पळविले

पती-पत्नीच्या तोंडावर स्प्रे मारुन सव्वातीन लाखांचे दागिने पळविले

Breaking News | Ahmednagar: रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून झोपलेल्या पती पत्नीच्या तोंडावर स्प्रे मारून त्यांना बेशुध्द करत घरातील आठ तोळे वजनाचे सव्वा तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना.

spraying on the husband and wife's face, jewels worth three and a half lakhs were stolen

राहता: रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून झोपलेल्या पती पत्नीच्या तोंडावर स्प्रे मारून त्यांना बेशुध्द करत घरातील आठ तोळे वजनाचे सव्वा तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी रात्री एकरुखे शिवारात घडली. याबाबत राहाता पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

राहाता पोलिसांत बजरंग हरी गाढवे रा. जांभळीचा मळा, रांजणगाव रोड, एकरुखे यांनी राहाता पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दिनांक ११ ऑगस्टच्या रात्री दीड ते पहाटे पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी किचन रुमचा कडी कोयंडा तोडून एक लाख चाळीस

हजार रुपयाचे गंठन, एक लाख चाळीस हजार रुपयांची सोन्याची साखळी व पंधरा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा ३ लाख २९ हजार रुपयांचा माल चोरून नेला. चोरट्यांनी बंगल्याचे मालक बजरंग हरी गाढवे व त्यांच्या पत्नी गाढ झोपेत असताना तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध केले व घरातील आठ तोळे सोने व वापरण्याचे कपडे घेऊन पसार झाले. बजरंग गाढवे यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच राहाता पोलीस घटनास्थळी पोहचले. श्वान पथकाला पाचारण करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र चोरटे वाहनात बसून फरार झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास सपोनि कमलाकर चौधरी करीत आहेत.

Web Title: spraying on the husband and wife’s face, jewels worth three and a half lakhs were stolen

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here