Home संगमनेर संगमनेर: इंस्टाग्रामवरील प्रेम टिकवण्यासाठी खून

संगमनेर: इंस्टाग्रामवरील प्रेम टिकवण्यासाठी खून

Breaking News | Sangamner Crime: एका मुलीशी इंस्टाग्रामवरील प्रेम टिकवण्यासाठी व पुढे नेण्यासाठी आरोपीने हा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात.

Murder to keep love on Instagram

संगमनेर:  तालुक्यातील झोळे गावात तीन दिवसांपूर्वी वृद्धाच्या झालेल्या खुनाचा उलगडला संगमनेर पोलिसांनी केला असून, याप्रकरणी गावातील तरुणाला अटक करण्यात आली आहे.

झारखंड येथे असलेल्या एका मुलीशी इंस्टाग्रामवरील प्रेम टिकवण्यासाठी व पुढे नेण्यासाठी आरोपीने हा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

तीन दिवसांपूर्वी झोळे गावातील साहेबराव उन्हवणे (वय 77) यांचा पहाटेच्या दरम्यान मृतदेह मिळून आला होता. मृतदेह त्यांच्या नेहमीच्या झोपण्याच्या ठिकाणी पलंगावर आढळून आलेला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या घटनास्थळ भेटीदरम्यान सदरचा मृत्यू हा घातपात असल्याचे दिसून येत होते.

त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. घटनास्थळीच एक पेनाने लिहिलेली चिठ्ठी देखील मिळून आली होती. त्या चिठ्ठीनुसार झारखंडमधील काही व्यक्तींनी खंडणी घेऊन हा खून केल्याचे नमूद केले होते.

सदरचे प्रकरण हे गंभीर असून गुंतागुंतीचे व आव्हानात्मक होते. गुन्ह्याच्या तपासात उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी तीन पथके तयार केली होती.

चिठ्ठीत नमूद असलेल्या झारखंडमधील व्यक्तींकडे केलेला तपास, चिठ्ठीत लिहिलेले अक्षर, झोळे ते संगमनेर दरम्यान महामार्गावरील संपूर्ण सीसीटीव्हीचा केलेला अभ्यास व मोबाईलचा आरोपीने अतिशय चलाखीने केलेल्या वापराचे विश्लेषणावरून वरील पथकांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने तपास करून यातील आरोपी उघड केला आहे.

आरोपी भूषण कांताराम वाळे (वय 23, रा. झोळे) हा असून त्यास रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे.

आतापर्यंतच्या तपासात झारखंड येथे असलेल्या एका मुलीशी या आरोपीची इंस्टाग्रामवरून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर इंस्टाग्रामवरच प्रेमात झाले होते.

हे इंस्टाग्रामवरील प्रेम टिकवण्यासाठी व पुढे नेण्यासाठी या आरोपीने हा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. 

Web Title: Murder to keep love on Instagram

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here