Home अहमदनगर अहमदनगर: रस्त्यात अडवून युवतीशी गैरवर्तन

अहमदनगर: रस्त्यात अडवून युवतीशी गैरवर्तन

Breaking News | Ahmednagar Crime: तरुणाने हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याची घटना.

Mistreatment of a young woman by stopping her on the road

अहमदनगर: युवतीला रस्त्यात अडवून तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार नगर शहरात घडला. या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल बाळू घोरपडे (रा. बोल्हेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. २ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी युवती किराणा दुकानात जात असताना राहुल घोरपडे याने तिला दुचाकी आडवी लावली. तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तु माझ्यासोबत फोनवर बोलली नाही तर तुला मारून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Mistreatment of a young woman by stopping her on the road

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here