Home पुणे ब्रेकिंग! भरदिवसा एका तरुणाची कोयत्याने निघृण हत्या

ब्रेकिंग! भरदिवसा एका तरुणाची कोयत्याने निघृण हत्या

Breaking News | Daund Crime: तरुणाला ओढत बाहेर आणतो व त्याचा कोयत्याने वार करत खून. (Killed)

young man was brutally killed by a coyote in broad daylight

दौंड:  पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव परिसरात भरदिवसा एका तरुणाची निघृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या निघृण हत्येची संपूर्ण घटना जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ही घटना 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, दिवसाढवळ्या एक व्यक्ती एका दुकानात घुसतो आणि एका तरुणाला ओढत बाहेर आणतो व त्याचा कोयत्याने वार करत खून करतो.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरज राहूल भुजबळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुरजची हत्या ही त्याचाच दाजी अमित बहिरटने केली आहे. CCTV फुटेजमध्ये दिसत आहे की, खामगाव येथील नागमोडी चौकात असलेल्या दुकानात अमित अचानक कोयता घेऊन घुसतो, व सुरजला ओढत बाहेर काढतो. त्यानंतर कोयत्याने त्याच्यावर 15 हून अधिक वार करून त्याची निघृण हत्या करून निघून जातो. दुकानाजवळ उभा असलेला एक व्यक्ती ही संपूर्ण घटना पाहतो पण भीतीमुळे तो काहीच करू शकला नाही.

कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. मयत सुरजची बहिण संजनाचा प्रेमविवाह अमित बहिरटशी दीड वर्षापुर्वी झाला होता. ते दोघे मुंबई येथे रहात होते. मात्र अमित हा दारु पिऊन संजनाचा छळ करत होता. त्यामुळे वैतागून संजना माहेरी आली होती. तरीही अमित तिला त्रास देत होता. संजनाच्या फिर्यादीनुसार अमितविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच नातेवाईकांनी घेतलेल्या समझोता बैठकीत अमितने संजनाला सोडचिठ्ठी देण्यासाठी 5 लाख रुपये देण्याची मागणी संजनाच्या आईने केली होती. मात्र अमितने सोडचिट्टी तर देणार नाही, तसेच तुझ्या मुलाचे तुकडे करीन अशी धमकी सुरजच्या आईला दिली होती.

या धमकीनंतर अमितने सुरजची हत्या केली आहे. याप्रकरणी अमित जयवंत बहिरट आणि समीर जयवंत बहिरट या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Web Title: young man was brutally killed by a coyote in broad daylight

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here