Home अहमदनगर अहमदनगर: राजे शिवाजी पतसंस्थेचे अध्यक्ष यांना घरातून अटक

अहमदनगर: राजे शिवाजी पतसंस्थेचे अध्यक्ष यांना घरातून अटक

Breaking News | Ahmednagar:  राजे शिवाजी पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य  यांना राहत्या घरातून अटक शनिवारपर्यंत पोलिस कोठडी, कर्ज प्रकरणातील कागदपत्रांचा गैरवापर.

Chairman of Raje Shivaji Credit Union arrested from home

पारनेर : तालुक्यातील कान्हूर पठार येथील राजे शिवाजी पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांना रविवारी (दि.२१) रात्री ११.३० वाजता राहत्या घरातून अटक आहे. अटक करययात आली आहेत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पारनेर न्यायालयात सोमवारी हजर केले असता शनिवारपर्यंत (दि. २७) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली. या प्रकरणातील इतर तीन आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पारनेरचे सहायक निबंधक कार्यालयातील तात्यासाहेब शहाजी भोसले यांनी तक्रार व चौकशी अहवालानुसार दि. ३ एप्रिल २०२४ रोजी पारनेर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली होती. त्यानुसार पारनेर पोलिसांनी या फसवणूक प्रकरणी रणजित गणेश पाचर्णे (रा. पाचर्णेमळा, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे), पोपट बोल्हाजी ढवळे (प्रोपा. सागर असोसिएट, रा. हंगा, ता. पारनेर), आझाद बाबासाहेब ठुबे (अध्यक्ष, राजे शिवाजी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, रा. कान्हूर पठार, ता. पारनेर), संभाजी भालेकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, राजे शिवाजी ग्रामीण बिगरशेती पतसंस्था), अशा चारजणांवर गुन्हा दाखल केला होता.

२०१९ मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी येथील रहिवासी असलेले शिवाजी रिकामे व इतर ११ जणांनी आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने सहायक निबंधक कार्यालयातील तात्यासाहेब भोसले, आर. व्ही. वाघमोडे व मुख्य लिपिक आर. एस. चाबुकस्वार यांच्या पथकाने १ डिसेंबर २०२३ रोजी अहवाल सादर केला होता. त्यानुसार पारनेरचे सहायक निबंधक गणेश औटी यांनी खासगी सावकार रणजित पाचर्णे व राजे शिवाजी पतसंस्था यांनी संगनमत करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खबर दाखल केली.

ठुबेंसह संभाजी भालेकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला..

आझाद ठुबे व संभाजी भालेकर यांनी गेल्या महिन्यात जिल्हा सत्र न्यायालयात या फसवणूकप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु, न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे पारनेर पोलिस आझाद

ठुबे यांच्या पाळतीवर होते. अखेर रविवारी रात्री ११.३० वाजता राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. संभाजी भालेकर माफीचा साक्षीदार बनल्याची माहिती समजली.

राजे शिवाजी पतसंस्था चौकशीच्या फेऱ्यात…

फसवणूक प्रकरणात आझाद ठुबे यांना रविवारी रात्री अटक कर स्यालकांचे धाबे दणाणले आहेत. पतसंस्थेच्या संचालक मंडळाने हातावर उचल घेतली आहे. ही देणी थकविल्याने ठेवीदारांच्या ठेवी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या तक्रारीनुसार ठेवी मिळत नसल्याने राजे शिवाजी पतसंस्था चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे.

Web Title: Chairman of Raje Shivaji Credit Union arrested from home

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here