Home अकोले भंडारदरा, मुळात पाण्याची आवक मंदावली

भंडारदरा, मुळात पाण्याची आवक मंदावली

Breaking News | Akole: भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात शुक्रवारपासून पाऊस कमी झाल्याने धरणांमध्ये येणारी आवकही कमी झाली.

Bhandardara, basically the inflow of water slowed down

भंडारदरा: भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटात शुक्रवारपासून पाऊस कमी झाल्याने धरणांमध्ये येणारी आवकही कमी झाली आहे.

 काल सायंकाळी संपलेल्या 24 तासांत 139 दलघफू पाणी भंडारदरात आले. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा काल सायंकाळी 4632 दलघफू (41.96टक्के) झाला होता. निळवंडेत 1559 दलघफू (18.32 टक्के) आहे.गत 24 तासांत पडलेला पाऊस असा मिमीध्ये भंडारदरा 3, घाटघर 38, पांजरे 23, रतनवाडी 27. मुळा धरण पाणलोट क्षेत्रात कोतूळ व हरिश्चंद्रगड परिसरातही पाऊस कमी झाला. सायंकाळी विसर्ग 1440 क्युसेक झाला होता.

भावली 57.04 टक्के भरले आहे.1434 क्षमतेच्या या धरणात 818 दलघफू पाणीसाठा आहे. काल या धरणात 63 दलघफू पाणी 24 तासांत दाखल झाले. भावलीला काल सकाळ पर्यंत 12 मिमी पावसाची नोंद झाली. मुकणे धरणात 14.78 टक्के, वाकी 9.23 टक्के, भाम 44.20 टक्के, वालदेवी 21.62 टक्के असा पाणी साठा झाला आहे. गंगापूर धरणाचा साठा 33.66 टक्के इतका झाला आहे. या धरणाच्या परिसरातही पावसाचा जोर मंदावला आहे. काल सकाळी 6 पर्यंत मागील 24 तासात पावसाने पुर्णता उघडीप दिली होती. कश्यपी, गौतमी गोदावरी परिसरातही हीच अवस्था आहे. कश्यपीत 11.93 टक्के, गौतमीत 27.30 टक्के, कडवा 40.17 टक्के, आळंदी 2.82 टक्के.

Web Title: Bhandardara, basically the inflow of water slowed down

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here