अहमदनगर जिल्ह्यात या तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस, पूल खचला
Breaking News | Ahmednagar: तालुक्यातील साकत व ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पिंपळवाडी व परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस, लेंडी नदीला पूर.
जामखेड: जामखेड शहर तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जामखेड शहरात तासभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जामखेड शहरात पाणी साचले होते. तालुक्यातील साकत व ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पिंपळवाडी व परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. यामुळे गावातील लेंडी नदीला पूर आला. हा पूल खचला असून, या मार्गावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहन चालकांनी या मार्गी जाऊ नये, असे आवाहन ग्रामस्थांनी केले.
जामखेड-सौताडा महामार्गाचे काम खूपच संथ गतीने सुरू आहे. यातच सौताडाजवळील पूल काही दिवसांपूर्वी वाहून गेला होता, तसेच रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता वाहतुकीस योग्य नाही. त्यामुळे अनेक वाहनधारक तसेच बीड, अंमळनेरकडे जाणारी वाहने पिंपळवाडी मार्गी वांजरा फाटा मार्गी जातात. मात्र, आता पूल खचल्यामुळे
जामखेड तालुक्यातील साकत येथील पिंपळवाडीच्या पुलावरून चाललेले पाणी. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
वाहतूक ठप्प झाली आहे. काही बस तसेच मोठ्या प्रमाणावर खासगी वाहने माघारी गेली. वाहतूक ठप्प झाल्याने अनेक नागरिक अडकलेले होते. तेव्हा पिंपळवाडीचे ग्रामस्थ दादासाहेब मोहिते, महारुद्र नेमाने, ईश्वर घोलप, मनोज नेमाने, शरद घोलप, धीरज नेमाने, प्रवीण घोलप, विशाल मोहिते यांनी नागरिकांना मदत केली.
साकत – कोल्हेवाडी मार्गावर साकतजवळ पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वराट वस्ती, कडभनवाडी या ठिकाणचा संपर्क तुटला आहे.
लेंडी नदीला पूर आला. यातच जनार्दन घोलप यांच्या शेळ्या वाहून चालल्या होत्या. शेळ्या पकडण्यासाठी ते गेले असता तेही वाहून चालले होते. मात्र, ग्रामस्थांनी तातडीने मदत केली. शेळ्या व घोलप यांना बाहेर काढले.
संगमेनरात दुपारी आणि सायंकाळी आषाढ सरी कोसळल्या. अकोलेच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. नगर जिल्ह्यात रविवारपासून मंगळवारपर्यंत हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
Web Title: Ahmednagar district, in this taluk, rain like cloudburst, bridges collapsed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study