Home नाशिक मैत्रिणीला भेटायला गेलेल्या तरुणाला अर्धनग्न करून अमानुष मारहाण

मैत्रिणीला भेटायला गेलेल्या तरुणाला अर्धनग्न करून अमानुष मारहाण

Breaking News | Nashik Crime: येवला शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मैत्रिणीचा फोन आल्याने भेटायला गेलेल्या तरुणाला अर्धनग्न करून अमानुषपणे मारहाण केल्याची घटना.

young man who had gone to meet his girlfriend was stripped half-naked

येवला: मैत्रिणीचा फोन आल्याने भेटायला गेलेल्या तरुणाला अर्धनग्न करून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा प्रकार येवला शहरात घडला आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाच्या फिर्यादीवरून चौघा संशयितांविरोधात येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ही घटना 17 जून रोजीची असून, मारहाण करणाऱ्यांनी कुटुंबीयांना दिलेल्या धमकीमुळे उशिरा फिर्याद दिल्याचे या तरुणाने फिर्यादीत नमूद केले आहे.

दाखल फिर्यादीनुसार 17 जून रोजी पैठणी विणकाम करणारा कारागीर असलेला प्रसाद खैरनार याला मैत्रिणीने कॉल करून माझ्या हाताला लागले आहे, भेटायला ये असा निरोप दिल्याने तो तिला भेटण्यासाठी एका कॅफेमध्ये गेला. तिथेच त्याच्यावर चार जणांच्या टोळक्याने हल्ला केला. तसेच त्याचे अपहरण करत एका बंद खोलीत चौघांसह मुलीच्या नातेवाइकांनी अमानुष मारहाण करत त्याचा व्हिडिओ काढला. यावेळी त्याचा मोबाइल आणि खिशातील रोख पैसेदेखील काढून घेण्यात आले. मारहाण झालेला तरुण मागास समाजातील असून, त्याच्या आई, वडील व नातेवाइकांना संशयितांनी दमदाटी केल्याने आपण उशिरा फिर्याद नोंदवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी येवला शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

दरम्यान, या प्रकरणी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पीडित तरुण व त्याच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

Web Title: young man who had gone to meet his girlfriend was stripped half-naked

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here