Home नाशिक अवैध मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या कारचा भीषण...

अवैध मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात एक ठार

Breaking News | Nashik Accident: तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलिसांच्या गाडीला कट मारला. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्यावर उलटली (Hit and Run).

Excise officials' car crashes while chasing a vehicle one dead

नाशिक:  नाशिक येथे गुजरात येथून नाशिक येथे अवैधरित्या मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या एका वाहनाचा पाठलाग करत असतांना उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. या घटनेत उत्पादन शुल्क विभागाचा एक कर्मचारी ठार झाला. तर दूसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील चांदवड-मनमाड मार्गावर हरनुल टोलनाक्याजवळ मध्यरात्री घडली.

कैलास गेनू कसबे (वय ५०, रा. नाशिक) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर राहुल पवार हा पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. तर आणखी एक जण या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याचे नाव समजू शकले नाही.

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,  एका वाहनातून गुजरात येथून नाशिक येथे अवैधरित्या मद्यसाठ्याची तस्करी होत असल्याची माहिती उत्पादन शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार चांदवड-मनमाड मार्गावर सापळा रचण्यात आला होता. मात्र, ही वाहन भरधाव वेगात पुढे गेल्याने उत्पादन शुक्लच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. पुढे मागे असा खेळ सुरू असतांना तस्करी करणाऱ्या वाहनाने पोलिसांच्या गाडीला कट मारला. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्यावर उलटली. हा अपघात हरनूल टोलनाक्याजवळ घडला. जखमी राहुल पवार यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहे. तर दरम्यान, मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या घटनेची दाखल मंत्री शंभुराजे देसाई यांनी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे  आदेश दिले आहेत.

Web Title: Excise officials’ car crashes while chasing a vehicle one dead

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here