धक्कादायक! जन्मदात्या वडिलांसह 5 जणांकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार
Breaking News | Pune Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार (abuse) केल्या प्रकरणी मुलीच्या वडिलांसह पाच जणांना अटक कऱण्यात आली.
पुणे : पिंपरी चिंचवडमधून नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी मुलीच्या वडिलांसह पाच जणांना अटक कऱण्यात आली आहे. 13 वर्षीय पीडितेनं दिलेल्या फिर्यादीनंतर चिखली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 एप्रिल ते 29 जून 2024 या कालावधीमध्ये ही घटना घडली.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी युट्यूबवर व्हिडिओ पाहत असताना समाधाव लवटे तिथे आला. तो मुलीला म्हणाला, की मी या व्हिडिओप्रमाणेच तुझ्यासोबत करेल. यानंतर तो मुलीला आपल्या घरी घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीने याबाबत आपल्या वडिलांना सांगितलं. मात्र, वडिलांनी तिला म्हटलं, की याबद्दल कोणाला बोलू नकोस अन्यथा आपली इज्जत खराब होईल.
वडिलांचं ऐकून मुलगी शांत बसली. नंतर ती आजारी पडल्याने घरात झोपली असताना तिच्या वडिलांनीच येऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलीने विरोध केला असता वडिलांनी तिला धमकी दिली, की याबद्दल कोणाला सांगितल्यास तुझे तुकडे तुकडे करेल. हे सगळं इथेच थांबलं नाही, तर पुढेही तिच्यासोबत भयंकर घडलं
मुलगी ट्यूशनसाठी गेली असता तिच्या शिक्षिकेच्या पतीने जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केले. यानंतर ती आपल्या आईच्या मैत्रिणीच्या घरी गेली असता तिच्या पतीने मुलीवर अत्याचार केले. यानंतर महिलेच्या दिरानेही मला तू खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेल, असं म्हणत मुलीवर जबरदस्ती केली. यानंतर 29 जूनच्या रात्री वडिलांनीही अत्याचार केले.
अखेर पीडितेने पोलिसात धाव घेत फिर्याद नोंद केली. यावरुन पीडितेचे वडील, समाधान लवटे, प्रताप धायतडे, नितीन हराळे, सागर हराळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सगळ्यांना अटक करण्यात आली आहे.
Web Title: abuse of minor girl by 5 persons including biological father
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study