Home नगर एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, १० ते...

एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, १० ते १२ प्रवासी जखमी

Breaking News | Nagar kalian Road Accident:  पारनेर-मुंबई एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला, तर एसटी चालकासह १० ते १२ प्रवासी किरकोळ जखमी.

ST bus and car collided head-on, two died in Accident

ओतूर: नगर-कल्याण महामार्गावर ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे कॉलेजजवळ पारनेर-मुंबई एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला, तर एसटी चालकासह १० ते १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. कारमधील दोघे डुबरवाडी येथील डी. फार्मसी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. या अपघातात महेश तानाजी गायकवाड (२३, रा. विद्यानगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि प्रतीक अशोक शिर्के (२२, रा. नारळा पैठण, जि. संभाजीनगर) हे दोघे जण जागीच ठार झाल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली,

रविवारी एसटी बस पारनेरकडून मुंबईच्या दिशेने निघाली असता ओतूरजवळ आल्यानंतर आळेफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या मारुती कारची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात बिझा या मारुती कारचा चक्काचूर झाला, तर एसटी बस विरुद्ध बाजूला जाऊन रस्त्यानजीकच्या खोल खड्यात पडली. यावेळी कारमधील दोघेजण ठार झाले. यावेळी एसटीमध्ये जवळपास ४० च्या वर प्रवासी होते. यातील बस चालक रमेश वसंतराव मोरे (४६, रा. वडजिरे, ता. पारनेर, जि. नगर) यांच्यासह प्रवाशांमधील १० ते १२

जण किरकोळ जखमी झाले. ओतूर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. अपघात झाल्यावर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. कारमधील अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी मदत केली. यावेळी अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Web Title: ST bus and car collided head-on, two died in Accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here