नाशिकमध्ये अजित पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Breaking News | Nashik NCP: लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी विरोधकांना आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून आता नाशिकचे कार्यकर्ते स्वगृही परतले.
नाशिक: गेल्या दोन वर्षांपूर्वी शरद पवार यांची साथ सोडत सिडकोतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक नाना महाले यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोट धरली. परंतु त्यानंतर तब्बल दोन वर्षांत अजित पवार गटात होणारी पक्षीय आणि राजकीय घुसमट सहन न झाल्याने नाना महाले आपल्या शेकडो समर्थकांसह अजित पवारांचे घड्याळ सोडून शरदचंद्र पवार गटात तुतारी वाजविण्यासाठी बारामती येथील गोविंदबागेत आज प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. तर नवीन नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे.
महाविकास आघाडीतून बाहेर पडत अजित पवार, भाजपा शिवसेना महायुतीत सहभागी झाले. यावेळी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत आले. मात्र लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी विरोधकांना आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून आता नाशिकचे कार्यकर्ते स्वगृही परतले आहेत.
दरम्यान, माजी नगरसेवक नाना महाले, माजी नगरसेवक दत्ता पाटील, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते, नवीन सिडको अध्यक्ष मकरंद सोमवंशी, दादा कापडणीस, नवीन नाशिक कार्याध्यक्ष सुनील आहिरे, नाशिक पश्चिम विधानसभा उपाध्यक्ष अक्षय परदेशी, राहुल कमनकर, ज्ञानेश्वर महाजन, सागर मोटकरी, अरुण निकम, राजेश भोसले, राजू पवार यांच्यासह नाशिक पश्चिम विधानसभा, सिडको, नवीन नाशिकच्या शेकडो प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.
याबाबत शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी म्हटले आहे की, नाशिकमधील अनेक पदाधिकार्यांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. नाना महाले, सिडको विभागाचे अध्यक्ष आणि अनेक पदाधिकारी प्रवेश केला आहे . दुसरा पक्ष तयार झाला आणि त्यांच्या मागे लोकं गेले होते. अजित पवार आणि भुजबळ यांची भाजपने ससेहोलपेट केली आहे. शरद पवारांचे नेतृत्व आम्ही नाशिकमध्ये सिद्ध केले आहे. भाजप वापरतो आणि सोडून देतो, हे लक्षात आल्याने हे लोकं शरद पवारांच्या पक्षात येत आहेत. विधानसभेला आम्ही आमचा आमदार करू, असे त्यांनी म्हटले आहे.
Web Title: Ajit Pawar’s group is in trouble, hundreds of workers join Sharad Pawar’s NCP
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study