पिंपळगाव खांड धरण भरले : पाणी मुळेकडे झेपावले
Breaking News | Akole: मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण अखेर भरले.
अकोले अकोले तालुक्यातील मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण अखेर भरले आहे. काल पहाटे साडेपाच वाजता धरण ओव्हर फ्लो होऊन पाण्याचा प्रवाह मुळा धरणाच्या दिशेनं झेपावला आहे.
मुळा नदी पाणलोट क्षेत्रात काल मंगळवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. दिवसभराच्या संततधार पावसामुळे आदिवासी भागात सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या आता ओल्या चिंब झाल्या आहेत. ओढे नाले सक्रिय झाल्याने मुळा नदीचा
प्रवाह वाढला आहे, पिंपळगाव खांड धरणात मोठी आवक झाली. आजही पावसाचे सातत्य टिकून आहे. ६०० दशलक्ष घनफूट क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो होऊन
१३९३ क्युसेकचा विसर्ग मुळा धरणाकडे झपावणार आहे. राहुरी तालुक्यातील २६ टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात आता आवक सुरू होणार आहे.
मुळा नदी पाणलोटामध्ये अकोले तालुक्यातील आंबित धरणानंतर आता पिंपळगाव खांड भरले. यंदाच्या पावसाळ्यात अकोले तालुक्यातील हे दुसरे धरण भरले आहे. मुळा नदी वाहती झाल्याने संगमनेर, अकोले तालुक्यातील मुळा परिसरात आनंद व्यक्त होत आहे.
Web Title: Pimpalgaon Khand Dam was filled
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study