Breaking News | Ahmednagar: गडावरून परतत असताना पिकअप पलटी, १० ते १५ भाविक किरकोळ जखमी, जखमींवर उपचार सुरू.
नगर : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पंढरपूर पायी दिंडी सोहळा सोमवारी डोंगरगण येथे मुक्कामी आला. दिंडीतील एक पिकअॅप दर्शनासाठी गोरक्षनाथ गडावर गेला होता. गडावरून परतत असताना पिकअप पलटी झाला. त्यात सुमारे दहा ते पंधरा भाविक किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. १) रोजी सायंकाळी वाजता घडली.
मंदाबाई सुदाम थोरे (रा. गोळेगाव, ता. वैजापूर), शाहुबाई मगर (रा. श्रीरामपूर), इमल चांगदेव आंबले (रा. गोंडेगाव, ता. श्रीरामपर). चांगदेव ज्ञानदेव आंबले, राजू मिसाळ, बाळासाहेब रंगनाथ खोपसे, संभाजी नासाहेव हरगुडे, भाऊसाहेब जगताप, नवनाथ तांबे, (ता. श्रीरामपूर) असे किरकोळ जखमी झालेल्या भाविकांचे नावे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. जखमींना तत्काळ उपचारासाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरहून पंढरपुरला निघालेल्या श्री संत निवत्तीनाथ महाराज पालखी व दिंडी नगर तालुक्यातील डोंगरगण येथे सोमवारी (दि.१) मुक्कामी येणार होती. त्यातील दिंडीतील काही भाविक मांजरसुंबा येथील श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडावर दर्शनासाठी गेले होते. दर्शनाहून परताना घाटातील पहिल्या वळणावर पिकअपचे ब्रेक फेल झाल्याने पिकअप रस्त्याच्या कडेला उलटला. या घटनेची माहिती माहिती समजताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक माणिक चौधरी, गावातील ग्रामस्थ सागर कदम, विक्रम कदम, सागर वाघमारे, आदींनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
Web Title: Accident tempo of Varakari changed
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study