अहमदनगर: सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद
Breaking News | Ahmednagar: गावठी कट्टा बाळगणार्या तरुणास राहाता पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
राहाता: शहरात गावठी कट्टा बाळगणार्या तरुणास राहाता पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत केला आहे. शहरात वाढत असलेली गुन्हेगारी पोलिसांपुढे आव्हान निर्माण करणारी असून नागरिकांच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. शनिवारी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमणे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देताना सांगितले, गुरुवारी 27 जून सकाळी आरोपी गोरख अशोक माळी, रा. मोरवा चिचोरा, तालुका नेवासा हा राहाता शहरात श्रीराम प्लॉटिंगजवळ गावठी पिस्टल बाळगुन संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती पोहेकॉ प्रभाकर शिरसाठ यांना मिळाल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक सोपान काकड यांना माहिती दिली.
पोलीस निरीक्षक काकड यांनी त्याठिकाणी पोलिस फौजफाटा पाठवून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी एक तरुण संशयीतरित्या फिरत असताना दिसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 75 हजार रुपये किमतीची एक चंदेरी रंगाची पिस्टल, एक पितळी रंगाचा राऊंड मिळून आले. मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी गोरख अशोक माळी याच्या विरुध्द राहाता पोलीस ठाण्यात गु.र.नं 303/2024 आर्म अॅक्ट 3/25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37 (1) (3) चे उलंघन कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सोपानराव काकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहेत. आरोपीवर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.क. 302, 201,34 सह आर्म अॅक्ट कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यांची कबुली आरोपीने दिली आहे. राहाता पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणार्या आरोपीला अटक केली.
Web Title: Sarait accused Gavathi Arrested along with Kattya
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study