Breaking News | Weather alert: राज्यामध्ये विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला.
पुणे : मान्सूनने शुक्रवारी देशातील आणखी काही भाग व्यापला आहे. त्यामध्ये दिल्ली, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, छत्तीसगडचा समावेश आहे. पुढील दोन दिवसांत संपूर्ण भारत मान्सूनने व्यापलेला असणार आहे. दरम्यान, राज्यामध्ये विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हवामान विभागाने शनिवारी मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट दिला आहे. खान्देश आणि मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रामधील घाटमाथा, पूर्व विदर्भात यलो अलर्ट दिला आहे, तर मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला.
Web Title: The intensity of rain will increase in the Maharashtra
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study